
बांधकाम सभापती दत्ता कदम यांनी आदर्श निर्माण केला
रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती दत्ता कदम यांनी आपला वाढदिवस साजरा न करता करोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मदत निधीकरिता २५ हजाराचा निधी देऊन एक आदर्श निर्माण केला.
करोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी तो साजरा न करता मुख्यमंत्री मदत निधीला मदत करण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले होते. त्याला प्रतिसाद देऊन कार्यकर्त्यांनी ५१ हजारचा निधी जमा केला. त्यातील २५ हजार रुपये त्यांनी मुख्यमंत्री निधीत जमा केले. याशिवाय स्थानिक पातळीवर मदत म्हणून १० हजार रुपये त्यांनी लांज्याच्या तहसीलदारांकडे सुपूर्द केले. उरलेल्या पैशातून त्यांनी परिसरातील १५० कुटुंबाना १ महिना पुरेल, एवढे अन्नधान्य मदत म्हणून दिले.
www.konkantoday.com