चितळे उद्योग समुहाने १ कोटी ५० लाखांचा निधी दिला
कोवीड-१९ मुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशा या संकटाच्या वेळी समाजाला आधार देण्यासाठी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून चितळे उद्योग समुहाने १ कोटी ५० लाखांचा निधी देऊन इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.यामध्ये बी. जी. चितळे भिलवडी स्टेशन यांच्याकडून १ कोटी रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तर चितळे बंधू मिठाईवाले पुणे यांच्याकडून ५० लाख रूपये पीएम केअर्स फंडसाठी देण्यात आले आहेत. सदर निधीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी श्रीपाद चितळे, विश्वास चितळे, गिरीष चितळे, निखील चितळे हे उपस्थित होते.
www.konkantoday.com