
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नये राज्यपालांची विद्यापीठांना सूचना
कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंशी विविध विषयांवर चर्चा केली.
सध्याच्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे कुठलेही शैक्षणिक नुकसान होणार नाही तसेच विद्यापीठांच्या उन्हाळी परीक्षा सामायिक पध्दतीने घेण्याचे दृष्टीने प्रयत्न करावे, अशी सूचना राज्यपालांनी कुलगुरुंना केली. उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी देखील व्हिडिओ कॉन्फरन्सव्दारे झालेल्या या बैठकीत सहभाग घेतला.
www.konkantoday.com