मूळ मराठी वंशाचेआयर्लंडचे पंतप्रधान लिओ वराडकर पुन्हा एकदा डॉक्टर झाले
प्रत्येक देश युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र अशातच आयर्लंडचे पंतप्रधान आणि मूळ मराठी वंशाचे काेकणातील मालवणचे असणारे लिओ वराडकर यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी लिओ वराडकर पुन्हा एकदा डॉक्टर झाले आहेत.
आयर्लंडमधील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून तिथं कोरोनाबाधितांची संख्या 5 हजाराच्या वर गेली आहे. या पार्श्वभूमीवर लिओ वराडकर यांनी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी पुन्हा एकदा डॉक्टरांच्या पेशात रजिस्ट्रेशन केलं आहे.काेकणातील मालवणचे असणारे लिओ वराडकर हे दर वर्षी कोणताही गाजावाजा न करता मालवणला येतात गेल्या वर्षीही ते येऊन गेले होते
www.konkantoday.com