
रत्नागिरी बीजेपी वर्धापन दिन हा सेवा दिवस म्हणून साजरा करणार -दीपक पटवर्धन
६ एप्रिल आज सोमवार हा दिवस बीजेपी रत्नागिरी सध्याच्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर सेवादीन म्हणून साजरा करणार आहे. १९८० साली ६ एप्रिल रोजी श्रध्येय अटलबिहारी वाजपेई आणि खा लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली बीजेपी ची स्थापना झाली. आज बीजेपी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र शासनात तसेच अनेक राज्यात सत्तास्थानी असून लोकशाही राज्य प्रणालीतील अनेक सत्ताकेंद्र बीजेपीच्या अधिपत्याखाली आहेत. संघटना म्हणून बीजेपी देशात सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. तसेच सर्वात जास्त सभासद संख्या असलेला जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. अटलजी ,प्रमोदजी ,अडवणीजी, जगन्नाथ जोशी ,राजमाता सिंधिया , भैरवसिंग शेखावत अश्या अनेक दिग्गज नेत्यांनी बीजेपी चे नेतृत्व केंद्रात केले आज नरेंद्र मोदीजी ,अमितजी शहा, नड्डा साहेब ,गडकरी साहेब, राजनाथसिंह असे नेतृत्व केंद्रात कार्यरत आहेत.
अश्या उत्तम स्थितीत असलेला बीजेपी महाराष्ट्रात सुद्धा देवेंद्रजी, चंद्रकांतदादा, आदींच्या नेतृत्वखाली विधीमंडळात सर्वात मोठा पक्ष आहे.
आज कोरोना विरुद्ध लढ्यात शासनासह बीजेपी ही जनतेच्या साठी झटत आहे .गरजू ना अन्न पुरवठा, शिधा वाटप, रक्तदान , प्रशासना बरोबर समन्वय या कामात बीजेपी चे हजारो कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी कार्यरत आहेत .५३८ मंडलात हे सेवा कार्य सुरू आहे.
रत्नागिरी मध्येही आज पर्यंत २००० घरांपर्यंत शिधा वाटप करण्यात आले तर ८००० लोकांना मास्क पुरवण्यात आले . शिधा ,मास्क ,अन्न पुरवठा ह्या गोष्टी ही बीजेपी चे कार्यकर्ते गरजू पर्यंत पोचवत आहेत.
आज वर्धापन दिनाचे औचित्य साधून ५००० लोकांपर्यंत शिधा रुपी मदत पोचवली जाईल. सर्व तालुका अध्यक्ष नगरसेवक आज स्वतः सेवा कार्यात उतरतील बीजेपीचे कार्यकर्ते आज एक दिवसात ५००० गरजू नागरिकां पर्यंत पोचण्या साठी योजना केली आहे. आजचा दिवस सेवा दिवस म्हणून साजरा केला जाईल. बीजेपीकार्यकर्ते सर्वदूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करतील आणि सेवा कार्यासाठी शुभेच्छा देतील. जिल्हाध्यक्ष म्हणून मी स्वतः या सेवा कार्यात सहभागी होणार असून मी स्वतः 200 कार्यकर्त्यांना मोबाईल चे माध्यमातून संपर्क करणार आहे. अशी माहिती दीपक पटवर्धन जिल्हाध्यक्ष बीजेपी रत्नागिरी यांनी दिली.
www.konkantoday.com