
शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी अखेर आज आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला.
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेला हायव्होलटेज मतदारसंघ असलेला दादर-माहीम मतदासंघातून शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर यांनी अखेर आज आपला निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल केला.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर सदा सरवणकर यांनी प्रतिक्रिया देताना मी कोणाच्या दबावाला घाबरत नाही, असे स्पष्ट सांगितले. आपल्यावर निवडणूक उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले.दादर-माहीम मतदारसंघातून सदा सरवणकर यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना चकवा देत निवडणूक अर्ज दाखल केला. सदा सरवणकर हे मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार होते. मात्र, मिरवणुकीत सहभागी न होता सदा सरवणकर यांनी थेट आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सदा सरवणकर यांनी म्हटले की, माझ्यावर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव होता आणि अजूनही असल्याचे सदा सरवणकर यांनी सांगितले. मला उमेदवारी मागे घेण्यास सांगणाऱ्यांनी काहीतरी थोडा विचार करावा असे सरवणकर यांनी म्हटले. मी कोणत्याही दबावाला घाबरत नसल्याचे सरवणकर यांनी स्पष्ट केले. आपल्यावर कोणाचा दबाव आहे, याचे उत्तर देणे सदा सरवणकर यांनी टाळले.