
पेठमाप येथे काच फोडून लॅपटॉपची चोरी
चिपळूण : तालुक्यातील पेठमाप येथे बिल्डींगमधील स्लायडिंगची काच फोडून ऑफिसमधील लॅपटाप चोरीस गेल्याची घटना घडली आहे. याबाबतची फिर्याद यासीन अब्दुल रेहमान दळवी (वय 53) यांनी पोलीस ठाण्यात दिली. ही घटना 12 ऑक्टोबर ते 13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.15 वा. च्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यासीन दळवी यांनी आपल्या मालकीच्या पेठमाप येथील मनाहील हाईट या बिल्डींगमधील ऑफिसमध्ये लॅपटॉप ठेवला होता. कोणीतरी अज्ञात चोरट्याने बाथरुम शेजारी स्लायडींगची खिडकी फोडून ऑफिसमधील 15 हजार रुपये किमतीचा लॅपटॉप चोरुन नेला. दळवी हे दुसर्या दिवशी ऑफिसला आल्यानंतर त्यांनी पाहिले असता लॅपटॉप दिसून आला नाही. त्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञातावर भादवि कलम 454, 457, 380 नुसार गुन्हा दाखल केला आहे.