विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून रत्नागिरीसाठी
३२ लाख रुपयांच्या निधी
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांच्या स्थानिक विकास निधीतून रत्नागिरीसाठी करोना प्रतिबंध आणि नियंत्रण उपाययोजनेकरिता मास्क खरेदीसाठी ३२ लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.रत्नागिरी जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी N 95 मास्कसाठी १७ लाख रुपये आणि राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण तालुक्यातील ग्रामपंचायतीचे आरोग्य व सफाई कर्मचारी, ग्रामदक्षता समितीचे स्वयंसेवक यांना कापडी मास्क ७५ हजार पुरविण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com