महाराष्ट्राच्या एकीला कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर सहन करणार नाही -मुख्यमंत्री
राज्यात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणाऱ्यांचे आभार मानले. ‘महाराष्ट्राच्या एकीला कोणी नख लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सहन करणार नाही, जाणीवपूर्वक चुकीचे व्हिडीओ पसरवू नका, त्यांच्यावर कारवाई करु,’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
www.konkantoday.com