चिंतातूर चाकरमान्याची आता मिळेल त्या मार्गाने गावी येण्याची धडपड
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात मुंबईत कामधंदा नसल्याने तसेच पैसा अडकाही संपल्याने चिंतातूर चाकरमानी आता मिळेल त्या मार्गाने गावी येत आहेत. हा ओघ कमी होण्याऐवजी वाढतच चालला आहे. शुक्रवारी पहाटे देखील तालुक्यातील म्हाप्रळ चेकपोस्ट येथे मुंबईहून पायी चालत आलेल्या आणखी १७ चाकरमान्यांना अडवण्यात आले. त्यांना तत्काळ म्हाप्रळ येथील विलगीकरण केद्रांत क्वारंटाईन करण्यात आले. म्हाप्रळ येथे क्वारंटाईन करण्यात आलेल्या चाकरमान्यांची संख्या ७१ वर पोहोचली आहे असाच एक प्रकार घडला असून
मुंबईत आंबे पोहोचवून रत्नागिरीकडे निघालेल्या एका ट्रकमधून पनवेलमधून तिघे जण निघाले होते. त्यांना खेडमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या तिघांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
www.konkantoday.com