
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे आणखी १ कोरोना बाधित रुग्ण सापडला
काल एकाच दिवशी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये १३ कोरोना बाधीत नवीन रुग्ण सापडले होते त्यामुळे एकच खळबळ उडाली होती.काल रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालांमध्ये दापोली येथे १ कोरोना बाधित रुग्ण सापडला आहे.हा रुग्ण दापोली येथील देर्दे येथील ३५ वर्षीय युवक आहे.या रुग्णाची मुंबई येथून आल्याची हिस्ट्री आहे.अशी माहिती तहसीलदार समिर घारे यांनी दिली आहे.यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोना बाधित रुग्णांची संख्या २९ इतकी झाली असून एकूण आतापर्यंत जिल्ह्यात ३५ कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत.यातील ५ जणांना या अगोदरच डिस्चार्ज देण्यात आला आहे तर १ चा मृत्यू झाला होता.
www.konkantoday.com