
भाजपा आणि युवा मोर्चातर्फे आयोजित तिरंगा बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद
रत्नागिरी – भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त भारत माता की जय, वंदे मातरम, घर घर तिरंगा हर घर तिरंगा, भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो. अशा गगनभेदी घोषणा देत भारतीय जनता पार्टी रत्नागिरी (दक्षिण) युवा मोर्चा, महिला मोर्चा, सर्व आघाड्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावतीने तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते.
शहरातील मारुती मंदिर सर्कल येथे रॅलीला सुरुवात होऊन राम आळी गोखले नाका, गाडीतळ, टिळक आळी, भारतीय जनता पार्टी कार्यालय, प्रमोद महाजन क्रीडासंकुल येथे समाप्त झाली.
यावेळी भाजपा द. रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, ॲड.बाबासाहेब परुळेकर, ॲड.अशोक कदम, सचिन करमरकर, मुन्ना चवंडे, प्रशांत डिंगणकर, राजू कीर, राजन फाळके, राजू भाटलेकर, राजन पटवर्धन, दादा ढेकणे, नितीन जाधव, निलेश आखाडे, महेंद्र मांडवकर, संदीप सुर्वे, भाई जठार, लिलाधर भडकमकर, महावीर जैन, अमित जैन, मंदार भोळे, महिला मोर्चाच्या ऐश्वर्या जठार, प्राजक्ता रुमडे, तनया शिवलकर, मानसी करमरकर, प्रणाली रायकर, पल्लवी पाटील, संपदा तळेकर, वर्षा ढेकणे, सोनाली आंबेरकर, युवामोर्चाचे प्रवीण देसाई, मंदार खणकर, गुरुप्रसाद फाटक, अनिष पटवर्धन, पमु पाटील, निशांत राजपाल आदी कार्यकर्ते उपस्थित होते. घरोघरी तिरंगा उपक्रमाचे जिल्हा संयोजक विक्रम जैन यांनी बाईक रॅलीचे नियोजन केले होते




