त्या रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह
येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह आल्याने आता जिल्हयात कोरोनाचा एकही रुग्ण नाही. असे असले तरी लॉकडाऊनच्या पुढील कालावधीत अधिक सतर्क राहण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
जिल्हयात होम क्वारंटाईन खाली ठेवण्यात आलेल्यांचीसंख्या 927 इतकी आहे. संस्थात्मक क्वारंटाईन अंतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालयात 14 जण निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहेत.
www.konkantoday.com