खासदार विनायक राऊत त्यांच्या खासदार निधीतून नागरिकांसाठी मास्क उपलब्ध करून देणार
शिवसेना सचिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्या खासदार निधीतून नागरिकांसाठी मास्क उपलब्ध करून देणार आहे. सवा दोन लाख मास्क ते त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांना मोफत देणार आहेत.खासदार निधीतून सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी एक लाख पन्नास हजार मास्क आणि रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर तालुक्यातील नागरिकांसाठी 75 हजार मास्क विनायक राऊत यांच्या खासदार निधीतून मोफत देण्यात येणार आहे.त्याचबरोबर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवकांसाठी एन 95 चे मास्क आवश्यक मागणी प्रमाणे खासदार निधीतून उपल्बध करून देण्यात येणार आहेत.
www.konkantoday.com