
एसटी महामंडळाची अनेक कॅन्टीन सेवा बंद, अव्वाच्या सव्वा दराने एसटीच्या वाणिज्य आस्थापनांच्या निविदा.
लांब पल्ल्याच्या एसटी बसमधून प्रवास करणार्या प्रवाशांनी भुकेने व्याकुळ होवून एकतर प्रवास करावा अथवा प्रवासासाठी वडाप किंवा अन्य पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. यासाठी एसटी महामंडळ विभाग प्रयत्नशील राहिल्याच्या तक्रारी होत आहेत. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली येथे एसटी बसमध्ये बसून रत्नागिरी अथवा मुंबईकडे प्रवास करणार्या बसमधील प्रवाशाने जेवायचे कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे.या भागातून प्रवास सुरू करणार्या प्रवाशांना राजापूर एसटी कॅन्टीन बंद, पाली कॅन्टीन बंद, संगमेश्वर बंद, चिपळूण बंद, चिपळूण शिवाजीनगर बंद, अशी स्थिती असेल तर प्रवाशांनी एसटीच्या प्रवासाकडे का वळावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.www.konkantoday.com




