
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना विषय दिवसभरातील अपडेट
1) राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे याची अंमलबजावणी जिल्ह्यात करण्यात येणार आहे.
2) रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यातील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत.
3) जिल्हयात खाजगी प्रवासी वाहतुकीस निबंध घालण्यात आले आहेत.
4) जिल्हा रुग्णालयात निरीक्षणाखाली दाखल असणाऱ्यांची संख्या 17 आहे. आत्तापर्यंत 25 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे.
5) होम क्वॉरंटाईन मधील जिल्ह्याची एकूण संख्या 389 इतकी आहे. यासोबतच पुणे आणि पिंपरी चिंचवड येथून येणाऱ्यांची यादी करण्यात येत आहे.
6) व्यापारी महासंघाच्या सहकार्यातून जिल्ह्यात शक्य तिथे घरीच किराणा सामान
पुरविण्याचा प्रयत्न आहे. तसेच विशिष्ट वेळी ठरवून दुकाने उघडण्याची मुभा दिली
जाणार आहे.
7) जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरळीत ठेवण्यात आली आहे.
8) पेट्रोलपंपावरील पेट्रोलच्या परिमाणावर व वितरण कालावधीवर नियंत्रण आणण्यात येत आहे.
9) संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कृषि सहायक, शिक्षक तसेच एनसीसी व एनएसएस यांच्या सेवा पोलीस मित्र म्हणून घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
www.konkantoday.com