
मॉडर्न पेंथोलॉन’ तर्फे ‘बॅथले’ च्या यशस्वी विध्यार्थी आणि डॉ निशिगंधा पोंक्षे यांचा सत्कार
मॉडर्न पेंथोलॉन असोसिएशन ऑफ रत्नागिरी यांच्यावतीने रत्नागिरीतून बॅथले क्रीडा प्रकारात निवडलेल्या विद्यार्थ्यांचा आणि रत्नागिरीत हा क्रीडा प्रकार आणणा-या डॉ. निशिगंधा पोंक्षे यांचा सत्कार करण्यात आला.
पॅनथेलॉन या क्रीडा प्रकारातील बॅथले म्हणजे धावणे-पोहोणे- धावणे हा क्रीडा प्रकार नुकताच सावर्डे येथे घेण्यात आला. या स्पर्धेत 20 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. 1200 मीटर धावणे, 200 मी पोहोणे आणि पुन्हा 1200 मीटर धावणे या सलग क्रीडा प्रकारच्या 17 वर्षाखालील 4 मुले आणि 4 मुलींची निवड करण्यात आली. यातील यशस्वी विद्यार्थी आणि डॉ. निशिगंधा पोंक्षे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर मॉडर्न पॅनथेलॉन असोसिएशन ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष संजय पाटणकर, डॉ निलेश शिंदे, डॉ तोरल शिंदे, हेरंब जोगळेकर, प्रवीण डोंगरे, जिजीपीएस स्कुलचे किरण जोशी, विनोद मयेकर, कोच महेश मिलके, अविनाश काळे, श्वेता जोगळेकर उपस्थित होते.
www.konkantoday.com