
रत्नागिरी जिल्हयासाठी
दस्त नोंदणी 31 मार्च पर्यंत स्थगित
कोरोना विषाणू या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण महाराष्ट्रात राज्यात आढळून येत असल्यामुळे या कोरोना विषाणू (COVID-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबधात्क कायदा 1897 दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3, व 4 मधील तरतूदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे. सदरचा कायदा रत्नागिरी जिल्हयासाठी लागू करण्यात येत असून कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हयातील दुय्यम निबंधक कार्यालयात अद्यापही दस्त नोंदणीसाठी बायोमेट्रीक प्रणालीचा वापर सुरु असून त्याद्वारे कोरोना विषाणूचा प्रसार व संसर्ग होण्यास धोक संभवत आहे. तसेच दस्त नोंदणीच्या कामी मोठया प्रमाणात गर्दी होवून त्यामधून संसर्ग होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्हयातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे कामकाज 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.
www.konkantoday.com