एलएनजी जेटीवर गॅस भरून आणलेल्या जहाजावर परदेशी कामगारांच्या आरोग्य तपासणीबाबत संभ्रम कायम
गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील आरपीजीएल अंतर्गत असणार्या एलएनजी जेटीवर विदेशातून लिक्वीड गॅस भरलेले कार्गो येत आहेत. या कार्गोमध्ये बाहेरील कामगार आहेत. परंतु जगात दहशत माजवणार्या कोरोना व्हायरसच्या धोक्यातून बाहेरून आलेल्या परदेशी कामगारांना सहाय्य करण्यासाठी आरजीपीपीएलमधील कामगारांना सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीच काळजी घेतली जात नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान, परदेशातून लिक्वीड गॅस घेवून येणार्या जहाजावरील परदेशी कामगारांना मदत करण्याचे काम आरजीपीपीएलमधील कामगार करत असतात. सध्या महिन्यातून तीन जहाज हा गॅस घेवून येत आहेत.
www.konkantoday.com