समुद्राच्या लाटांबरोबर आलेल्या डॉॅल्फीनला स्थानिक युवकांनी दिले जीवदान
दापोली तालुक्यातील मुरूड येथे समुद्राच्या लाटेबरोबर किनार्यावर आलेल्या डॉल्फीनला येथील युवकांनी जीवदान दिले. समुद्राच्या प्रवाहाबरोबर डॉल्फीन पाण्याबाहेर आल्याचे येथे काम करणार्या युवकांना दिसून आले. त्यामुळे येथील राजू नरवणकर, मनोज पवार, संदीप महाडीक, अरबाज ऐनरकर, प्रणय पवार, इब्राहीम, अफान दिलशाद या युवकांनी त्याला पकडून समुद्राच्या पाण्यात पुन्हा सोडून दिले.
www.konkantoday.com