कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेही सतर्क
कोकण रेल्वेच्या सर्व गाड्यांमध्ये साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. तसेच एसी कोचमधून ब्लँकेट आणि पडदे काढून टाकण्यात आले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर २४ तास 10722 ही हेल्पलाईन कार्यान्वित करण्यात आली आहे.कोकण रेल्वेत काम करणार्या अधिकारी आणि कर्मचारीवर्गाला सॅनिटायझर्स आणि मास्क देण्यात आले आहेत. कोरोनाबाबत जनजागृती करणारे पोस्टर्स रेल्वेस्थानकावर लावण्यात आले असून प्लॅटफॉर्मवरही कोरोनाबाबत सावधता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रेल्वेस्थानकावरील शौचालये, पायर्या, प्रतिक्षाकक्ष, डेस्क काऊंटर आणि इतर ठिकाणीही साफसफाई आणि स्वच्छता मोहिम राबवण्यात आली आहे. कोकण रेल्वेने आरोग्य पथके तैनात ठेवली असून त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आणि पॅरामेडिकल कर्मचार्यांचा समावेश आहे. कोरोनाबाधित आणि संशयीत रुग्णांच्या देखरेखीसाठी एकूण ६०बेड ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये चिपळूण ७ रत्नागिरी २० मडगाव १०, कारवार ५, उडुपी येथील १० बेडचा समावेश आहे.
www.konkantoday.com