
फेब्रुवारी मार्च २०१५ मधील अवेळी पाऊस गारपिटीमुळे शेती व फळपिकांना झालेल्या नुकसानीची भरपाईआठ वर्षानंतर मिळणार
फेब्रुवारी मार्च २०१५ मधील अवेळी पाऊस गारपिटीमुळे शेती व फळपिकांना झालेल्या नुकसानीकरिता शेतकर्यांना विशेष पॅकेज जाहीर केले होते. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील शासन पॅकेज अंतर्गत व्याज भरपाई/ मागणीचे प्रस्ताव या शासनाकडे पाठविण्यात आले होते. या प्रस्तावानुसार एकूण ७८ लाभार्थीना १० लाख ९२ हजार २४९ इतके अनुदान मंजूर झाले आहे. मात्र २०१५ मधील पावसाच्या नुकसानीचा दिलासा २०२३ मध्ये मिळत आहे.
राज्यातील गारपीट ग्रस्त आणि अवकाळी पाऊसग्रस्त शेतकर्यांचे तीन महिन्यांचे व्याज माफीचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आलेले होते. याअंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकांचे व्याज माफीचे प्रस्ताव जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी कार्यालयाकडून सहकार आयुक्त निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या कार्यालयाला मंजुरीसाठी पाठविण्यात आलेले होते. यानुसार सुरूवातीला जिल्ह्यातील विविध बँकांमधील ११६ कर्जदार/सभासदांचे प्रस्ताव दि. २० मार्च २०१७ रोजी मंजूर झाले. व त्यांना १५ लाख ४९ हजार ३३६ ही रक्कम अदा करण्यात आली. www.konkantoday.com