आदर्श शाळा पुरस्कारासाठी राजापूर तालुक्यातून एकही प्रस्ताव गेला नसल्याने आश्चर्य
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून दरवर्षी देण्यात येणार्या आदर्श शाळा पुरस्कारात कनिष्ठ प्राथमिक शाळा राजापूर तालुक्यातून एकही प्रस्ताव आला नाही. तालुक्यात पहिली ते पाचवीच्या २१६ शाळा आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीकडून प्रस्ताव सादर करण्यासाठी पाठपुरावा करूनही त्याकडे प्राथमिक शाळांमधील शिक्षकांनी दुर्लक्ष केल्याचे कळते.
www.konkantoday.com