संकल्प युनिक फाउंडेशन चा जो संकल्प आहे तो कौतुकास्पद-विवेक शेरे

रत्नागिरी-संकल्प युनिक फाउंडेशन,या एनजीओ ची रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील फणसवणे कळंबस्ते येथे शाखा कार्यालयाचे उद्घाटन झाले.यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते विवेक शेरे यांनी संकल्प युनिक फाउंडेशन चे कौतुक करून गेलेल्या तीन वर्षांत संस्थेने गोरगरीब जनतेची जी सेवा केली आहे ती वाखाणण्याजोगी असल्याचे सांगत संगमेश्वर विभागात संस्थेने कार्यालय स्थापन करून ग्रामीण भागात काम करण्याचा संकल्प कौतुकास्पद आहे असे सांगून या संस्थेच्या कार्यात तालुक्यातील सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.राजू पोमेंडकर यांनी ही एनजीओ संस्था आपल्या ग्रामीण भागात काम करते आहे हे स्वागतार्ह आहे.या संस्थेच्या माध्यमातून गावात अनेक सामाजिक कार्य आपण सर्वांनी मिळून करू आणि यासाठी माझ्या कडून नेहमीच सहकार्य राहील असे सांगितले.
पत्रकार वहाब दळवी यांनी ही आपण स्वत या कायद्यात सहकार्य करू असे सांगत नवीन कार्यालयाला शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी एनजीओ चे संगमेश्वर विभाग प्रमुख मजीद नेवरेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष दिलावर कोंडकरी यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली.उपाध्यक्ष शकील गवाणकर यांनी प्रस्तावना करून गेलेल्या तीन वर्षांत संस्थेच्या कामाचा अहवाल उपस्थितांसमोर मांडला.
कळंबस्ते फणसवणे शाखा अध्यक्ष मजीद नेवरेकर यांनी आपण या संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करू आणि या संस्थेत सर्वांनी काम करण्यासाठी यावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाला संगमेश्वर तालुक्यातील मान्यवर, कळंबस्ते, फणसवणे,कसबा या पंचक्रोशीतील नागरिक तसेच रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी मधील ईस्माइल नाकाडे, युसुफ शिरगावकर,सयीद मुल्ला, रमजान होडेकर, नाझीम मजगावकर, जमीर खलफे आदी पदाधिकारी उपस्थित होते.कळंबस्ते फणसवणे कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख इरम नेवरेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button