
रत्नागिरीत पुढील वर्षापासून विद्यार्थीनींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय होणार -ना. सामंत
पुढील शैक्षणिक वर्षापासून रत्नागिरीत केवळ विद्यार्थीनींसाठी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले जाणार आहे, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
शिमगोत्सव आणि अन्य कार्यक्रमांसाठी ना. सामंत रत्नागिरीत आले होते. कोरोना आजारासंदर्भातील आढावा बैठकीनंतर ते येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते. कोरोना आजाराविषयीच्या खबरदारीची तसेच आढावा बैठकीत झालेल्या कामकाजाची माहिती त्यांनी दिली.
केवळ विद्यार्थीनींसाठी रत्नागिरीत अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू केले जाणार आहे. त्याची जागा निश्चिती आणि किती विद्यार्थीनींना प्रवेश मिळेल इत्यादी तपशिल अद्याप ठरलेला नाही. मात्र पुढील शैक्षणिक वर्षापासून हे महाविद्यालय रत्नागिरीत सुरू होईल.
www.konkantoday.com