
रत्नागिरी रेल्वेस्थानक दिसायला सुंदर परंतु पावसात लागतेय गळती.
रत्नागिरी रेल्वेस्थानकाच्या नुतनीकरण केलेल्या इमारतीच्या छताला २० दिवसांपासून लागलेली गळती थांबत नसल्याने प्रवाशांना मनस्ताप सोसावा लागत आहे. गळती थांबत नसल्याने कोट्यवधी रुपये खर्चून केलेल्या एकूणच कामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.कोकण रेल्वे मार्गावरील प्रमुख रेल्वेस्थानकांचे नुतनीकरण व सुशोभिकरणाची कामे करण्यात आली. त्यानुसार रत्नागिरी रेल्वेस्थानकाचा देखील चेहरामोहरा बदलण्यासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर करण्यात आला होता.
उदघाटन झाल्यानंतर पडलेल्या तुफानी पावसाचा छताचा आतील भाग कोसळला. त्यानंतर या रेल्वेस्थानकाचे छत उडाल्याचा प्रकार समोर आला होता. त्यावेळी काम अर्धवट असल्याचा पवित्रा प्रशासनाकडून घेण्यात आला होता. यानंतर रेल्वे स्थानकाचे नुतनीकरणाचे काम पूर्ण झाल्याचे सांगून उदघाटन करण्यात आले होते. नव्याने उभारण्यात आलेल्या या रेल्वेस्थानकाची भव्यता पाहून अनेकांकडून कौतूक करण्यात आले होते. मात्र पावसाने प्रशासनाचा सावळा गोंधळ उजेडात आणला.www.konkantoday.com