
कोकणच्या पर्यटन विकासासाठी स्वतंत्र कमिटी नेमून अभ्यास अहवाल तयार करावा -सुशिलकुमार शिंदे
कोकणातील पर्यटन वाढीसाठी राज्य सरकारने सचिव, उपसचिव स्तरावर स्वतंत्र कमिटी स्थापन केली पाहिजे. या समितीने पायाभूत सुविधांसोबत काही स्थळे विकसित करण्यासोबत काही स्थळे विकसित करण्याबाबतचा अभ्यास अहवाल तयार करावा, असे मत कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले.
गुहागरमध्ये पर्यटनासाठी कुटुंबासमवेत आलेल्या सुशिलकुमार शिंदे यांच्याशी गुहागर पत्रकारांनी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे, सौ. उज्वला शिंदे यांनी कुटुंबियांसमवेत शिमगोत्सवाचा आनंद घेतला.
www.konkantoday.com