रत्नागिरीतील मनोरुग्णालयात कर्मचाऱ्यांकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार
रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयातील मुलाचे अदलाबदल प्रकरण अजून संपले नसताना आता येथील प्रादेशिक मनोरुग्णालयात मुलीवर अत्याचार हाेण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे मनोरुग्णालयात उपचार घेणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला असून ही मुलगी पाच महिन्यांची गरोदर आहे या प्रकरणी जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी शहर पोलिस स्थानकात तक्रार दाखल केले आहे या प्रकरणी सदरच्या मुलीकडे पोलिसाने चौकशी केली असता ही मुलगी शिपाई काका एवढेच उत्तर देत असल्याने हा प्रकार नेमक्या कोणत्या कर्मचाऱ्याने केला याचा शोध पोलीस घेत आहेत सध्या अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेवरून आता शासकीय रुग्णालयात देखील महिलांची सुरक्षितता धोक्यात आली असल्याचे दिसत आहे
www.konkantoday.com