
महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम या वर्षी थंडावली
महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम संपूर्ण जिल्ह्यात २००८ पासून सुरू झाली. श्रमदानावर आधारित या मोहिमेतून बंधारे बांधून पाणी अडवण्याचा अभिनव उपक्रम पंचायत समिती गुहागर व कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सहकार्याने गेली ११ वर्षे जोमाने सुरू आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे मिशन बंधारे मोहीम राबवण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्षच झाले आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्यता आहे.यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रशासन ऑक्टोबर महिन्यापर्यंत विलगीकरण, उपचार, ‘माझे कुटुंब’ मोहीम यात इतके गुंतले की आपण सुरू केलेल्या चांगल्या परंपरेचाही विसर पडला. जिल्हा परिषदेने कार्यक्रम दिला नाही. पंचायत समितीने तो खाली नेला नाही. परिणामी ग्रामस्थांनीही या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्षच केले.
www.konkantoday.com