
देवरुखसह दुय्यम निबंधक कार्यालयाला स्वमालकीच्या इमारतीची प्रतिक्षा
सह दुय्यम निबंधक कार्यालय संगमेश्वर हे गेली अनेक वर्षे भाड्याच्या जागेत आहे. अधिकारी व कर्मचार्यांना स्वमालकीच्या इमारतीची प्रतीक्षा आहे. दरवर्षी भाड्यापोटी शासनाचे लाखो रुपये खर्च होत आहेत. मात्र नूतन इमारतीसाठी प्रस्ताव पाठवूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने वरिष्ठ अधिकार्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीत निबंधक कार्यालयाचे कामकाज सुरू होते. तहसीलच्या नूतन इमारतीचे कामकाज सुरू झाल्याने या कार्यालयाचे भाड्याच्या जागेत स्थलांतर करण्यात आले. सध्या कै. लक्ष्मीबाई राजवाडे चौकात हे कार्यालय सुरू आहे.www.konkantoday.com




