
रत्नागिरी नगर परिषदेने भटक्या कुत्र्यांसाठी सुरू केले अभियान, निर्बिजीकरणाने रोखणार कुत्र्यांचा उपद्रव
रत्नागिरी शहरात वाढलेल्या भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी नगर परिषदेमार्फत या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम सुरू झाली आहे. सोसायटी फॉर ऍनिमल प्रॉटेक्शन या एनजीओने हे काम हाती घेतले आहे. शहरातील विविध भागातून त्यांचे निर्बिजीकरण करण्यात आले. तसेच या भटक्या कुत्र्यांपासून कुणाला त्रास होवू नये म्हणून लसही टोचण्यात आल्या आहेत. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी विशेष पुढाकार घेत नगर परिषदेच्या माध्यमातून या कुत्र्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. आरोग्य सभापती राजन शेट्ये, सर्व नगरसेवक तसेच मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली आारोग्य विभागाचे अधिकारी कांबळे, शेख यांच्याकडून कार्यवाही केली जात आहे.
www.konkantoday.com