रत्नागिरीकरांना नगर परिषदेकडून दिलासा ,अर्थसंकल्पात कोणतीही कर वाढ नाही
रत्नागिरी नगर परिषदेच्या तीन कोटी एकूण साठ लाख रुपयांच्या शिलकी अंदाजपत्रकाला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली अर्थसंकल्प रत्नागिरीकरांच्या दृष्टीने दिलासा देणारा आहे अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आलेली नाही नगराध्यक्ष बंड्या साळवी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली शहरातील अपंग कल्याणकारी योजनांसाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे स्मशानभूमी नूतनीकरणासाठी साठ लाख ,सार्वजनिक गटारे पूल वहाळ बांधणीसाठी चार कोटी, नगर परिषदेच्या शाळांच्या दुरुस्तीसाठी नव्वद लाख ,व्यायामशाळा सामान खरेदीसाठी व नाट्यगृह साहित्य खरेदीसाठी पन्नास लाख, रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी पन्नास लाख, उद्यानात रोपे लावण्यासाठी पन्नास लाख ,घनकचरा प्रकल्पासाठी नऊ कोटी ,भटक्या कुत्र्यांच्या निर्बिजीकीकरणासाठी पंचवीस लाख अशी तरतूद करणेत आलीआहे
www.konkantoday.com