आता पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यांकडून सरपंच निवडण्यात येणार
सरपंच थेट लोकांमधून निवडून देण्याचा भाजप सरकारचा कायदा महाराष्ट्र विकास आघाडीने बदलला आहे. थेट जनतेतून सरपंच निवडल्याने निर्माण होणारा समन्वयाचा अभाव आणि रखडणारी कामे यामुळे या कायद्यात सुधारणा करणारे विधेयक दोन्ही सभागृहांत मंजूर करण्यात आले.त्यामुळे आता पूर्वीप्रमाणेच ग्रामपंचायत सदस्यांकडून सरपंच निवडण्यात येणार आहे. राज्यपालांची संमती मिळाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होईल.
www.konkantoday.com