मोबाइल व्यावसायिकांवर गोळी झाडणाऱ्या सचिन जुमनाळकर ला कर्नाटकातून पोलिसानी पकडले?
रत्नागिरीतील नॅशनल मोबाइलचे मालक मनोहर ढेकणे यांच्यावर गोळी झाडून फरारी झालेला गुंड सचिन जुमनाळकर याला रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या विशेष पथकाने कर्नाटकातून अटक केल्याचे वूत्त आहे त्याला आज रत्नागिरीत आणण्यात येणार आहे ढेकणे यांच्यावर गोळी झाल्यानंतर आरोपी हा फरारी झाला होता त्याचा सर्वत्र शोध सुरू होता त्याला पकडण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र टीम तयार करण्यात आली होती पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हा कर्नाटकात असल्याचे समजले होते त्यामुळे त्याच्या मागावर पोलीस पथक गेले होते त्याला तेथे सापळा रचून पकडण्यात आलेचे कळते.त्याला आज रत्नागिरीत आणण्यात येणार आहे दरम्यान या घटनेत जखमी झालेले ढेकणे यांना अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्यात आले आहे
www.konkantoday.com