नॅशनल मोबाइलचे मनोहर ढेकणे यांच्यावरील हल्ला खंडणी प्रकरणातून ?


रत्नागिरी शहरातील प्रसिद्ध नॅशनल मोबाइलचे मालक मनोहर ढेकणे यांच्यावर काल रात्री गोळी झाडण्याचा प्रकार घडला ह्यात ढेकणे हे जखमी झाले होते.त्यांच्या पोटाला गोळी लागली आहे मात्र त्यांच्या प्रकृतीला धोका नाही. ढेकणे यांच्यावरील हल्ला खंडणी प्रकरणातून झाला असावा यामध्ये सराईत गुन्हेगार सचिन जुमनाळकर यांच्या सहभाग असावा असा पोलिसांना संशय आहे पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत
मनाेहर ढेकणे हे दुकान बंद करून साडेनऊच्या दरम्यान बंदरराेड वरील आपल्या इमारतीखाली उभ्ये असताना अचानक एक कार येऊन थांबली कारमधील उतरलेल्या दोघांनी ढेकणे याच्यावर गोळी झाडली गोळीचा आवाज ऐकून ढेकणे यांचा मुलगा व आजूबाजूचे नागरिक धावत आले तोपर्यंत आरोपी फरारी झाले. ढेकणे यांना जखमी अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेत् यांच्या पोटात गोळी लागल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली पोलिसांनीही या प्रकाराची गंभीर दखल घेत घटनास्थळी धाव घेतली संशय असलेला आरोपी सचिन जुमाकर हा दोन दिवसांपूर्वीच पॅरोलवर बाहेर आला होता यापूर्वीही त्याने खंडणीसाठी धमक्या दिल्या होत्या पोलिसानि आता आरोपी सचिन व त्यांच्या सहकाऱ्यांच्या शोधासाठी पोलीस पथके पाठवली आहेत यामुळे यातील आरोपी लवकरच पोलिसांच्या ताब्यात येतील असा अंदाज आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button