स्टेडियममधील गाळ्यांचा अचानक भाव वाढला
मुदत संपलेल्या छत्रपती शिवाजी स्टेडीयममधील गाळे घेण्यासाठी व्यापार्यांची मोठी चढाओढ सुरू आहे. सध्या आनंद स्वीटमार्ट असलेल्या गाळ्यासाठी उत्तम चव्हाण यांनी तब्बल ७५ लाखांची बोली लावली आहे. एका गाळ्यासाठी तब्बल ७५ लाखांची बोली लावल्यामुळे मूळ मालकांसह अधिकारीही गोंधळून गेले. तीन वर्षाच्या कालावधीसाठी एवढ्या रक्कमेची बोली लावल्याने पालिकेची तिजोरी मात्र भरणार आहे.
स्टेडियममधील ११ पैकी ५ गाळ्यांसाठी बोली पद्धतीने लिलाव प्रक्रिया घेण्यात आली तर ६ गाळ्यांपैकी बोलीच न लागल्याने नव्याने निविदा प्रक्रिया घेण्यात येणार आहे.
www.konkantoday.com