
काजू व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी रत्नागिरीत २९ फेब्रुवारीला राज्यस्तरीय काजू परिषद
संकटात सापडलेल्या काजू उद्योगाला उभारी देण्यासाठी काजू प्रक्रियाधारक संघाच्यावतीने २९फेब्रुवारी ते १ मार्च अशा सलग दोन दिवशी रत्नागिरी एमआयडीसीत राज्यस्तरीय काजू परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी शेतकरी, ग्रामस्थ काजू उत्पादक असून या व्यवसायाला सर्व संबंधितांची कुटुंबे अवलंबून आहेत. मोठ्या प्र्रमाणात काजू प्रक्रिया कारखान्यांची उभारणी केल्यास स्थानिक पातळीवर रोजगार, स्वयंरोजगाराच्या सुविधा सहजपणे उपलब्ध होवू शकतात.
रत्नागिरी काजू प्रक्रियाधारक संघाने गंभीर समस्येतून मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय काजू परिषद आयोजित केली आहे. कृषी, पणन महामंडळ, कृषी उत्पन्न बाजार समिती, आत्मा कार्यालय, कोकण कृषी विद्यापीठ, शासकीय यंत्रणा, वित्तीय संस्था आदींमधील अधिकारी, खातेप्रमुख, तज्ञ आदी मान्यवर राज्यस्तरीय परिषदेला मार्गदर्शन करणार आहे. काजू उत्पादक शेतकरी, काजू प्रक्रियाधारक यंत्रणसामुग्री तयार करणारे उद्योजक आदींनी या व्यवसायाला चांगले दिवस येण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्व संबंधितांनी या राज्यस्तरीय काजू परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्यावतीने करण्यात आले आहे.
www.konkantoday.com