रत्नागिरी पोलीस दलातर्फे,“रत्नसागरचा राजा”-बिगर यांत्रिकी (पगार) स्पर्धा 2023 चे आयोजन

रत्नागिरी पोलीस दलातर्फे, मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र, श्री. प्रवीण पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली दिनांक 11/03/2023 रोजी कर्ला जेट्टी च्या सागरी किनाऱ्यावर, “मिशन सागर” अंतर्गत “रत्न सागरचा राजा”, “बिगर यांत्रिकी (पगार) स्पर्धा 2023” चे आयोजन करण्यात आले.
या उत्तुंग सागारामध्ये दिवसरात्र काम करणाऱ्या मच्छिमार, बोट चालवणारे, कोळी बांधव यांच्यामध्ये एकोपा निर्माण करणे, सागर सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने जनसंपर्क अभियानाचा एक भाग म्हणून अशा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
या स्पर्धे करिता रत्नागिरीमधील एकूण ४० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला.
पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या शुभहस्ते व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. जयश्री गायकवाड, उप विभागीय पोलीस अधिकारी, रत्नागिरी उपविभाग श्री. सदाशिव वाघमारे, उप विभागीय पोलीस अधिकारी, चिपळूण उपविभाग श्री. सचिन बारी, उप विभागीय पोलीस अधिकारी, खेड उपविभाग श्री. शशिकीरण कशिद, श्री. विनित चौधरी, पोलीस निरीक्षक, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, श्री. अविनाश केदारी, सपोनि सुरक्षा शाखा, रत्नागिरी, श्री. मनोज भोसले सपोनि, रत्नागिरी शहर पोलीस ठाणे, तसेच कर्ला ग्रामपंचायत सरपंच श्रीमती. जबिन शिरगावकर व उप सरपंच श्री. समीर भाटकर, कर्ला मच्छिमार सोसायटीचे माजी अध्यक्ष श्री. नदीम सोलकर व सुमारे ४०० स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितित “बिगर यांत्रिकी (पगार) स्पर्धा 2023” स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली.
सर्व विजेत्या स्पर्धकांना पोलीस अधीक्षक, श्री. धनंजय कुलकर्णी यांच्या शुभ हस्ते पारितोषिक, प्रशस्तीपत्र व चषक प्रदान करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये खालील नमूद स्पर्धकांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.
1) श्री. मोजाम मोहम्मद मिरकर व श्री सिकंदर कासम भाटकर, दोन्ही रा. भटये, रोख रक्कम ५०००/- प्रशस्तीपत्र व चषक,
2) श्री. अल्तमश ताजुद्दीन होडेकर व श्री. मिलाद अब्छुल्ला सोलकर, दोन्ही रा. भाटये, रोख रक्कम ३०००/- प्रशस्तीपत्र व चषक,
3) श्री. बिलाल रशिद सोलकर व श्री. शोएब शफिक बुडये, दोन्ही रा. कर्ला रोख रक्कम २०००/- प्रशस्तीपत्र व चषक.

या स्पर्धेचा आनंद अनेक स्थानिक नागरिकांनी उपस्थित राहून लुटला तसेच ही स्पर्धा जिंकलेल्या व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व स्पर्धकांचे पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. धनंजय कुलकर्णी यांनी अभिनंदन केले.

“सागरी सुरक्षेसाठी रत्नागिरी जिल्हा कटिबद्ध असून सर्व नागरिकांनी त्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे व वेळोवेळी माहिती व मदतीसाठी क्रमांक ११२ व १०९३ या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधावा”.
श्री. धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button