नाणारचा प्रकल्प होणार नाहीच तो विषय केव्हाच बंद झालाय -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


सामनातील कोकण आवृत्तीमध्ये नाणार प्रकल्पाचे समर्थन करणारी जाहीरात आली होती. त्यामुळे शिवसेनेने नाणार संदर्भातील भुमिका बदलली का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यावर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली बाजू स्पष्ट केली आहे. शिवसेनेचे निर्णय आणि धोरण मी ठरवतो ते सामनातून मांडले जातात. कोणता जाहीरातदार शिवसेनेची भूमिका ठरवत नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
सामनामध्ये अनेक जाहीराती येतात. त्या प्रत्येकात माझा सहभाग नसतो किंवा ती शिवसेनेची भुमिका नसते. त्यामुळे नाणारच्या जाहीरातीबाबतही प्रश्न उपस्थित व्हायचा प्रश्न नाही. जाहीरात आली आणि शिवसेना बदलली असं होत नाही. हा विषय केव्हाच बंद झालाय यावर बोलण्याची गरज नसल्याचे ठाकरे म्हणाले. नाणार संदर्भात कोणी चर्चेसाठीही आले नसल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button