
राज्यातील प्रत्येक आयटीआयमध्ये रात्रीच्या अभ्यासिका; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले उद्घाटन
महाराष्ट्र राज्य नेहमी देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ म्हणून काम करत आहे. उद्योगजगताला आवश्यक असलेले कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून आपण नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान युवा पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.तसेच कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षांमध्ये तीन लाख उमेदवारांना रोजगार प्राप्त झाला आहे. भारत युवा देश म्हणून ओळखला जातो. युवकांना कौशल्य विकासाच्या, रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱ्या राज्यातील प्रत्येक आयटीआयमध्ये अभ्यासिका सुरू होत असून, त्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने झाले. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रकाश सुर्वे, अपर मुख्य सचिव आशीषकुमार सिंह, कौशल्य विकास आयुक्त डॉ. रामास्वामी एन, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक अनिल गावित यांसह ४१८ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे प्राचार्य व विद्यार्थी ऑनलाईन उपस्थित होते.
www.konkantoday.com