
अनधिकृत झोपड्या तोडू नये ,झोपडपट्टीवासियांचा दावा न्यायालयाने फेटाळला
रत्नागिरी शहरातील मुरूगवाडा परिसरातील झोपडय़ा तोडण्याबाबत रत्नागिरी नगर परिषदेने कोणतीही कार्यवाही करू नये यासाठी झोपडपट्टीवासीयांनी दाखल केलेला दावा न्यायालयाने खर्चासह फेटाळून लावला आहे या झोपडपट्टीवासियांना रत्नागिरी नगर परिषदेकडून झोपड्या काढून टाकण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्या होत्या या कारवाईला स्थगिती मिळावी म्हणून झोपडपट्टीवासीयांनी कोर्टाकडे धाव घेतली होती रत्नागिरी नगर परिषदेच्या वतीने अँड . निलांजन नाचणकर यांनी बाजू मांडली.
www.konkantoday.com