
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी यात्रेचा उपयोग होत असेल, तर त्यावर रिॲक्शन ही होणारच- मंत्री उदय सामंत यांचा सिंधुदुर्गात इशारा
जन आशीर्वाद यात्रा ही मोदी सरकारची कामगिरी सांगण्यासाठी असेल, तर आमचं काहीही म्हणणं नाही; पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यासाठी यात्रेचा उपयोग होत असेल, तर त्यावर रिॲक्शन ही होणारच असा इशारा पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिला मनाई आदेशाचे उल्लंघन झाले तर प्रशासन योग्य ती कारवाई करेल, असेही ते म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुणी टीका करू नये.जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून शिवसेनेवर टीका झाली तर त्याची रिॲक्शन देखील निश्चितपणे होणार आहे.“ श्री. सामंत यांच्यासमवेत आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, संदेश पटेल, शैलेश भोगले व शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
www.konkantoday.com