परीक्षेतील गैरप्रकार व कॉपी रोखण्यासाठी कोकण परीक्षा बोर्ड सज्ज


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी १२ वीची परीक्षा अवघ्या काही आठवड्यावर येवून ठेपली आहे. त्यासाठी कोकण परीक्षा बोर्डाची तयारीसुरू झालीआहे. रत्नागिरी व सिंधुदुर्गातील सर्व परीक्षा केंद्र संचालकांच्या बैठका घेतल्या जावून परीक्षेतील गैरप्रकार व कॉपी रोखण्यासाठी नियोजन आखले जात असल्याचे बोर्डाचे सचिव देवीदास कुलाळ यांनी सांगितले.
बारावीच्या परीक्षेला येत्या १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसाठी कोकण विभागातून रत्नागिरी व सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे मिळून एकूण ३० हजार ९१९ विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button