
कशेडी घाटात घातक रसायन आोतणाऱ्या दोन टँकर चालकांना अटक
मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात घातक रसायन आेतणाऱ्या दोन टँकरचालकांना पोलादपूर पोलिसांनी पकडले. मनोहर सिसोदिया व भैरुलाल बाराला अशी अटक केलेल्यांची नावे आहेत हे दोघे टँकरचालक आपल्या टँकरमधील घातक रसायन कशेडी घाटातील झाडा झुडपात आेतत असताना पोलिसांनी त्यांना पकडले .काही महिन्यांपूर्वी बोरज धरणात अशा प्रकारे घातक रसायन ओतल्याने तेथील पाणी प्रदूषित झाले होते .
www.konkantoday.com