
कोकण मार्गावर १० रोजी मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वेच्या काही गाड्यांवर परिणाम
कोकण रेल्वे मार्गावरील निवसर-राजापूर विभागादरम्यान मालमत्ता देखभालीच्या कामांसाठी १० मे रोजी सकाळी ९.१० ते सकाळी ११.४० या वेळेत अडीच तासाचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे तीन रेल्वेगाड्यांच्या सेवांवर परिणाम होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.या मेगाब्लॉकमुळे १०१०६ क्रमांकाची सावंतवाडी-दिवा एक्सप्रेस १० मे रोजी सावंतवाडी येथून ४५ मिनिटे उशिराने म्हणजेच ८.४० ऐवजी ९.२५ वाजता सुटेल १२०५१ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस १० मे रोजी रत्नागिरी-निवसर विभागादरम्यान ३० मिनिटे थांबवण्ययात येईल. २२११९ क्रमांकाची सीएसएमटी-मडगाव तेजस एक्सप्रेस १० मे रोजी रत्नागिरी स्थानकात २० मिनिटे थांबवण्यात येईल. या बदलाची प्रवाशांनी नोंद घ्यावी असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.www.konkantoday.com