चिपळुणातील गोवंश हत्या प्रकरणी दोन आरोपींना अटक ,आंतरराज्य टोळी
चिपळूण परिसरात गेल्या काही दिवसात गोवंश हत्येचे दोन प्रकार घडले होते या प्रकरणी पोलिसांनी सापळा रचून दोन मुख्य आरोपींना मीरा रोड मुंबई येथून अटक केली या प्रकरणात आंतरराज्य टोळीचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले या प्रकरणात पोलिसांनी मोहम्मद कुरेशी राहणार जोगेश्वरी मुंबई व त्याचा साथीदार शहजाद चौधरी या दोघांना सापळा रचून मुंबई येथून ताब्यात घेतले. या प्रकरणात आंतरराज्य टोळी कार्यरत असून यामध्ये अन्य आरोपींचाही समावेश आहे त्याच्या शोधात पोलीस आहेत सदरचे आरोपी इनोव्हा कारमधून येत असत व भटकी गुरांना उचलून घेऊन त्यांची निर्जर स्थळी कत्तल करून ते मांस मुंबईत नेत असत.सदर टोळीने गुजरात महाराष्ट्र दीव दमन परिसरात या अधिक गुन्हे केलेले आहेत रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी याबाबत तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
www.konkantoday.com