रत्नागिरी शहरातील साळवी स्टॉपपासून सर्व बेकायदेशीर टपऱ्या हटविणार
गेल्या काही महिन्यात शहरात बेकायदेशीर टपऱ्या वाढत असल्याने विविध माध्यमानी नगरपरिषदेवर जोरदार टीका केली होती त्याची दखल घेत रत्नागिरी नगर परिषदेने आता साळवी स्टॉप पासून शहरातील सर्व बेकायदेशीर टपऱ्या हटवण्याचा निर्णय घेतला आहे रत्नागिरी नगर परिषदेची विशेष सभा नुकतीच नगराध्यक्ष बंड्या साळवी अध्यक्षतेखाली पार पडली शहरात उभ्या झालेल्या बेकायदेशीर टपऱ्या हातगाड्या याला नगरसेवकच जबाबदार असल्याचा आरोप सध्या नागरिकांकडून होत आहे याची दखल सभेत घेण्यात आली शहरातील या बेकायदेशीर टपऱ्या हटवून येथील व्यावसायिकांना हॉकर झोनच्या माध्यमातून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे टपऱ्या हटवण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे मात्र टपऱ्यांवरील कारवाई रद्द करण्यासाठी कोणत्याही नगरसेवकाने मध्यस्थी करू नये असे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सांगितले .त्यानंतर रत्नागिरी शहर टपऱ्या मुक्त करण्याचा निर्णय झाला
www.konkantoday.com