रोपाची पाहणी न करता वनखात्याने ऑर्डर रद्द केल्याने लाखो रुपयांचे नुकसान
रत्नागिरीच्या पाच गावांमध्ये किनारी भागात कांदळवन व असोसिएट रोपवाटिका तयार करण्याचे आदेश वनविभागाने तेहतीस कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत दिले होते त्याप्रमाणे मावळंगे येथील संतोष तोसकर यांनी रोपनिर्मितीचे टेंडर भरले होते यासाठी एक लाखाच्यावर रोपांची निर्मिती करण्यात आली होती मात्र वनक्षेत्रपाल प्रियांका लगड यांनी रोपांची पाहणी न करताच परस्पर रोप निर्मितीची ऑर्डर रद्द केल्याचा आरोप बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव राजेंद्र आयरे यांनी केला केला आहे त्यामुळे संतोष तोसकर हे आर्थिक संकटात सापडले आहेत
www.konkantoday.com