
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आता स्थानिकांसाठी ७० टक्के जागा, शासनाचा नवा निर्णय
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरती करताना आता शासनाने नवा व महत्वाचा निर्णय घेतला आहे. पदभरती करताना स्थानिक उमेदवारांना प्राधान्य देण्यासाठी बँकेच्या कार्यक्षेत्रातील मूळ रहिवासी असणार्या ७० टक्के जागा स्थानिकांच्या भरव्यात व उर्वरित ३० टक्के जागा जिल्ह्याबाहेरील उमेदवारांना खुल्या असाव्यात असा महत्वाचा निर्णय घेतला आहे. शिवाय पदभरतीसाठी ७ पैकी ४ कंपन्या रद्द केल्या आहेत. यापुढे ही भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आयबीपीएस, टीसीएस आणि एमकेसीएल या तीन कंपन्यांची निवड केली असून नोकर भरतीत पारदर्शकता येण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप सावंत यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा सहकारी बँकेतील नोकर भरतीसंदर्भात घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत करताना संदीप सावंत यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांचे आभार मानले आहेत.
www.konkantoday.com




