महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ फार्म टुरिझम संकल्पना राबविणार
निवास न्याहरी व महाभ्रमण योजनेमध्ये नवे बदल करण्यात येणार असून श्रेणीवाढ पद्धत संकेतस्थळ आरक्षण आणि शेती पर्यटनावर भर देण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र पर्यटनचे विभागीय पर्यटन प्र्रमुख संजय ढेकणे यांनी दिली.
जिल्ह्यात जास्तीत जास्त पर्यटन वाढ व्हावा व स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, या हेतूने महामंडळ आपल्या संकेतस्थळावरून अशा योजनाधारक व हॉटेल व्यावसायिक यांची प्रसिद्धी करण्यात येणार आहे. या योजनेचे आरक्षणही पर्यटकांना महामंडळाच्या संकेतस्थळावरून करता येणार आहे. जेणेकरून पर्यटकांच्या संख्येत वाढ होवून त्यामुळे रोजगार निर्मिती व महसूल निर्माण होईल. तसेच विदेशी पर्यटकांनाही जिल्ह्याकडे आकर्षित करता येईल. याशिवाय महामंडळामार्फत जिल्ह्यात फार्म टुरिझम ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे सांगितले.
www.konkantoday.com